पु. ल. देशपांडे सुविचार आपल्या भाषेत आणि एक व एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. तसेच सचित्र स्वरुपात देखील उपलब्ध. आशा आहे तुम्हाला पु. ल. देशपांडे यांचा हा संग्रह नक्कीच आवडेल.
पु. ल. देशपांडे सुविचार – भाग १
- झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
- कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे काही व्यक्तित्व, जे काही अस्तित्व, जी काही अस्मिता असेल, जे गुण असतील, ते तुमचे स्वत:चे घेऊन तुम्हाला उभं रहावं लागतं. तुम्ही डिट्टो अमुक तमुक झालात कि डिट्टोच राहिलात आयुष्यभर.
- जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!
- काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अंमलात आणला. ज्याचे बळ त्याचा काळ आणि ज्यांचा काळ त्यांचा न्याय.
- चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून असतं. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?
- हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच – पोपट, मांजर आणि कुत्रा. एका इसमाने माकडही पाळलं होतं. पण दोघांच्या आचरटपणाची इतकी चढाओढ चालायची कि कोणी कोणाला पाळलंय हेच कळत नसे.
पु. ल. देशपांडे सुविचार – भाग २
- आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी, दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्यादिपत्कार, आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दस-याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा.
एकावाक्यात पु. ल. देशपांडे सुविचार
- शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
- जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
- प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
- मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
- परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!.
- मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते.
- कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला कि त्यातूनच स्वत:च्या पोरांना अमेरिकेला धाडून दुसऱ्याच्या पोरांना ‘शासकीय मराठीत शिका’ असा उपदेश करणारे पुढारी तयार होतात.
- भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा याच जगातली “माणसं” दाखवतो.
- ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
- आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
- चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात. फरक इतकाच कि, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
वाचत रहा: व. पु. काळे यांचे सुंदर विचार व सुविचार येथे.