मैत्रीवर सुंदर छोटी गोष्ट

मैत्रीवर सुंदर छोटी गोष्ट

मैत्रीवर छोटी गोष्ट

मैत्रीवर छोटी गोष्ट आपल्या मराठीत

एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, “मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. “त्यावर लाट म्हणाली, “अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.”

 

निष्कर्ष: मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

मैत्रीवर एक सुंदर सचित्र सुविचार:

तुम्हाला हि कथा कशी वाटली आणि व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

मैत्रीवर सुंदर सुविचार देखील येथे नक्की वाचा.

गोष्ट एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची

Marathi Story Meet

Marathi Story Meet

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे निश्चित होते.
त्या माणसाला काही सुचेनासं झालं. पण तासा भरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडलातो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय?

सुरक्षा रक्षक म्हणाला या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जिव वाचवेल.

म्हणून नेहमी लक्षात ठेवा:

जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

 

तुम्हाला हि कथा कशी वाटली आणि व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

विमानतळावर वाट पाहणाऱ्या मुलीची गोष्ट

Marathi Story

Marathi Story about Judge

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.

थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती व्ही.आय.पी. वेटिंग एरियात जाऊन पुस्तक वाचत बसली. तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!” “माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!” ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले. “आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का? मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता. आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात.

तुम्हाला हि कथा कशी वाटली आणि व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.