मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते नक्कीच वाचा

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते:

  • आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा.
  • मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा.
  • आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा.
  • मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा.
  • मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा.
  • आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा.
  • मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा.
  • भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा.
  • मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा.
  • आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा.
  • मित्र बिझी (व्यस्त) असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा.
  • आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा.
  • आपण जसा विचार करतो तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा.
  • आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा.
  • खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा.
  • कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा.
  • आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा.
  • आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर (व्याख्यान) वाटायला लागते तेव्हा.
  • मित्र online (ऑनलाईन) दिसतोय पण आपल्या message (मेसेज, संदेश) ला reply (रिप्लाय) देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore (दुर्लीक्षित) करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा.

मैत्री

         खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते, तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात. असे असेल, तसे झाले असेल, असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही.
       तेव्हा मित्रांनो! तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेलतर मित्राची क्षमा मागायला लाजू नका.

मैत्रीवर एक सुंदर सुविचार:

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते

मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर सुद्धा अवश्य वाचा.

आदर्श जीवन जगण्यासाठी

आदर्श जीवन जगण्यासाठी हे नक्कीच वाचा

आदर्श जीवन जगण्यासाठी हे नक्कीच करा

आदर्श जीवन जगण्यासाठी:

  • चूक झाली तर मान्य करा.
  • समोरच्याचे मत विचारात घ्या.
  • चांगल्या कामाची स्तुती करा.
  • आभार मानायला विसरू नका.
  • “मी” ऐवजी “आपण” शब्द प्रयोग करा.
  • सतत हसत मुख रहा.
  • दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
  • कुणाच्याही व्यंगावर हसू नका.
  • स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
  • टिका तक्रार यात वेळ घालवू नका.
  • कृतीपूर्व विचार करा.
  • लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
  • क्रोधावर नियंत्रण ठेवा.
  • मैत्री भावना कायम मनी राहू द्या.
  • नेहमी सत्याची कास धरा.
  • इतरांना चांगली वागणूक द्या.
  • सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करा.
    आणि सर्वात महत्त्वाचं
  • विचार करून बोला.

जीवनावर एक सुंदर सुविचार:

तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते? माहितीये? जाणून घेण्यासाठी येथे नक्कीच वाचा.

मित्र कोणाला म्हणायचे?

जाणून घ्या मित्र कोणाला म्हणायचे

मित्र कोणाला म्हणायचे?

मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर

ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.

– पु. लं. देशपांडे

मित्रावर एक सुंदर सुविचार:

मित्र सुविचार मराठी

हे देखील अवश्य वाचा: मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

सर्वजण तुम‍च्या प्रथम ओळीत असू शकत नाही

सर्वजण तुम‍च्या प्रथम ओळीत असू शकत नाही नक्कीच वाचा

सर्वजण तुम‍च्या प्रथम ओळीत असू शकत नाही

सर्वजण तुम‍च्या प्रथम ओळीत असू शकत नाही.

जीवन एक रंगमंच आहे म्हणून काळजीपूर्वक आपल्या प्रेक्षकांना आमंत्रित करा.

आपल्या जीवनात सगळेच प्रथम ओळीत असण गरजेच नाही.

आपल्या जीवनात काही लोक आहेत ज्यांना काही अंतरापासून पासून प्रेम करावे लागते .

सर्वजण तुम‌‍‌‌च्या प्रथम ओळीत असू शकत नाही.

तुमच्या आसपास असलेल्या नात्यांवर लक्ष द्या निरीक्षण करा .कोण तुम्हाला खाली नेतो आणि कोण वर. कोण प्रोत्साहित करतो आणि कोण परावृत्त ? कोण उंचावर नेतो आणि कोण उतारावर ? जेव्हा तुम्ही विशिष्ट लोक सोडता तुम्ही अनुभवता चांगले किंवा वाईट ?

जेव्हा तुमच्याजवळ अधिक गुणवत्ता, आदर, वाढ, चांगले मन, प्रेम, सत्य आणि शांती असते तेव्हा कोण  तुमच्या पहिल्या रांगेत असायला हवेत, कोण नको आणि कोण तुमच्या प्रथम ओळीत असावेत याचा निर्णय घेण सोप होत.

जर तुम्ही तुमच्या आसपासचे लोक बदलू शकत नसाल तर कोणते लोक तुमच्या आसपास असावेत हे तुम्ही ठरवू शकतात.

चांगले लोकांचे परिणाम हे चांगले जीवन असल्याचे लक्षात ठेवा आणि म्हणून नेहमी चांगले लोक निवडा जशी आपण चांगली माहिती ठेवतो. नेहमी तुमचे विचार, स्वप्ने नकारात्मक लोकांसमोर मांडू नका.

ते तुमची निवड आणि तुमचे जीवन आहे. हे आपल्यावर अवलंबून आहे.

जीवन एक रंगमंच आहे .

तुमच्या प्रेक्षकांना काळजीपूर्वक आमंत्रित करा.

लेखक : अनोळखी

एक सुंदर सुविचार:

लोकांवर सुंदर सुविचार येथे नक्कीच वाचा.