व. पु. काळे यांचे सुविचार

व. पु. काळे सुविचार एक व एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. तसेच सचित्र स्वरुपात देखील उपलब्ध. आशा आहे तुम्हाला व. पु. काळे यांच्या सुविचारांचा हा संग्रह नक्कीच आवडेल.

व. पु. काळे सुविचार – भाग १

  • मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत.
  • कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो.
  • खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  • प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो.
  • आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे.
  • कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
  • वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
  • कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

व. पु. काळे सुविचार

व. पु. काळे सुविचार – भाग २

  • आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतचा सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
  • स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.
  • प्रयत्नात ढिलेपणा नको. कष्ट करतांना सवलत नको. महत्वकांक्षेला मर्यादा नको आणि आपल्याइतक्याच पॊटतिड्केन दुसरी व्यक्ती आपल काम करेल ही भ्रांत नको. प्रयत्न करत असतांना निर्णय घेणारी आणखी एक शक्ति आहे, ह्याच भान ठेवाव. आपण प्रयत्नात ढिलाई केली नाही. हे समाधान कोणीही हिरावुन घेउ शकत नाही.
  • शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
  • माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.
  • खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
  • रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
  • रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
  • आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. – (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

व. पु. काळे सुविचार

एका वाक्यात व. पु. काळे सुविचार – भाग १

  • अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
  • भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
  • आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
  • प्रत्येक माणूस हे एक कोड आणि प्रत्येक माणूस एकदाच हे आणखी एक कोड – आपण सारे अर्जुन.
  • माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.
  • ‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
  • वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
  • सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस.
  • तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
  • औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
  • गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
  • संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
  • संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात.
सुंदर व पु काळे सुविचार आयुष्य
व पु काळे सुविचार

एका वाक्यात व. पु. काळे सुविचार – भाग २

  • खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
  • पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
  • आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते.
  • पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच.
  • जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. – (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही कि त्रास होतो.
  • बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.
  • आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
  • सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
  • कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
  • आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.
  • ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. – (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)

व. पु. काळे सुविचार

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.

निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

6 उत्तरे द्या “व. पु. काळे यांचे सुविचार”

    1. आपल्या टिप्पणीबद्दल आभार. कृपया चित्रांवर क्लिक केल्यास आपणाला लिंक मिळेल, उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचारांबद्दल कळवा तसेच शेअर बटणाचा देखील वापर करू शकतात

  1. व . पु. काळे . ह्यांचे सर्व कादंबरी मधील उतारे छान आहेत . व. पु. आवडते लेखक आहे. भक्तराज अलोणे.

    1. ज्ञात असलेल्या सुविचारांचे पुस्तकाचे नाव लिहण्याचा प्रयत्न आहे. आशा आहे तुम्हाला हे सुविचार आडवले असतील. आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

Leave a Reply