स्वामी विवेकानंद यांचे सुविचार

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी भाषेत आणि एक व एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. तसेच सुंदर सचित्र स्वरुपात देखील उपलब्ध. आशा आहे तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचा आम्ही सादर केलेला हा संग्रह नक्कीच आवडेल.

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

 • स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • आपणाला आतून बाहेर वाढावं लागेल. कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही, कोणीही आपल्याला अध्यात्मिक घडवू शकत नाही. तुमच्या आत्म्याव्यतिरिक्त दुसरा शिक्षक नाही.
 • एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला तुमचं जीवन बनवा – तिचा विचार करा, तिचं स्वप्न बघा, त्या कल्पनेवर जगा. मेंदू, स्नायू, नसा, आपल्या शरीराचा प्रत्येक भाग त्या कल्पनाने पूर्ण होऊ द्या, आणि फक्त प्रत्येक इतर कल्पना सोडून द्या. हा यश मिळवण्याचा मार्ग आहे.
 • आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे; म्हणून आपल्याला काय वाटते त्याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत. विचार जगतात; ते दूर प्रवास करतात.
 • स्वत:चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
 • जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात , कारण ती पडत असतात. पण, खरं म्हणजे ती पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात.
 • मन समुद्रातल्या भवाऱ्यासारखे आहे. ते माणसाला दूर नेऊन बुडवते. एक वेळ समुद्राला बंध घालणे सोपे असेल, पर्वत उपटणे सोपे असेल, पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे.
 • व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 • सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वत:चे सेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.
 • परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
 • भविष्यकाळाची चिंता करण्याचे सोडून द्या. त्यामुळे कोणतीही कार्यसिद्धी होत नाही. चिंता करायचीच असेल तर तर आपल्या चारित्र्याची करा.
 • डोक्यावर जणू दु:खाचा मुकूट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दु:खाचेही स्वागत केलेच पाहिजे.
 • अस्तित्वात या! जागृत व्हा! आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.
 • आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल. हारलात तर मार्गदर्शन कराल.

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

एकावाक्यात स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

 • जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.
 • जग हे महान व्यायामशाळा आहे जेथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी येतो.
 • सत्य एक हजार वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जाऊ शकते, तरी प्रत्येकजण सत्य असू शकतो.
 • आपण देव शोधण्याकरता कुठे जाऊ शकतो जर आपण त्याला स्वतःच्या हृदयात आणि प्रत्येक जीवनात बघू शकत नाही.
 • देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.
 • जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.
 • निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.
 • स्वत:च्या अज्ञानाची जाणीव असणे, हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.
 • प्रथम आज्ञाधारक व्हा, आदेश देण्याचा अधिकार मग तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल.
 • ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?
 • आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, हि निष्टा मेघांतून पाडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणे असली पाहिजे.
 • सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट अशी शंभर जरी तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडवता येईल.
 • स्वत:च्या बाहेर ईश्वराला शोधणे अशक्य आहे कारण, आपलं शरीर हेच त्याचे खूप मोठे निवासस्थान व मंदिर आहे.
 • देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वरसेवा होय.
 • दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
 • नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलिकडे जा.
 • संतांनी भूतकाळाकडे व पाप्यांनी भविष्यकाळाकडे नजर ठेवावी.
 • संकटांची अभेद्य भिंत उभी राहीली, तरी ती भेदून त्यातून मार्ग काढणारे चारित्र्यच असते.
 • दयाशील अंत:करण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच होय.
 • आध्यात्मिक ज्ञानाचे दान हे सर्वश्रेष्ठ दान होय.
 • दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

अधिक वाचा: बेंजामिन फ्रँकलिन यांचे सुद्धा सुंदर विचार व सुविचारयेथे नक्कीच वाचा.

Leave a Reply