विमानतळावर वाट पाहणाऱ्या मुलीची गोष्ट

Marathi Story

Marathi Story about Judge

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.

थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती व्ही.आय.पी. वेटिंग एरियात जाऊन पुस्तक वाचत बसली. तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!” “माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!” ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले. “आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का? मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता. आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात.

तुम्हाला हि कथा कशी वाटली आणि व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

प्रेमावर विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)

Love Quotes Marathi

Love Quotes Marathi and in English language. Quotes are also available in Pictorial format. Hope you will like it.

Love Quotes Marathi

Love yourself. It is important to stay positive because beauty comes from the inside out. – Jenn Proske

स्वत: वर प्रेम करा. सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे कारण सौंदर्य आतून बाहेर येते. – जेन प्रॉस्के

Love Quotes Marathi


Beauty is when you can appreciate yourself. When you love yourself, that’s when you’re most beautiful. – Zoe Kravitz

आपण स्वत: ची प्रशंसा करू शकता तेव्हा सौंदर्य असते. जेव्हा आपण स्वत: वर प्रेम करता, तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो. – झो क्रेविट्झ


Love and compassion are necessities, not luxuries. Without them humanity cannot survive. – Dalai Lama

प्रेम आणि करुणा अत्यावश्यक असतात, चैनी नव्हे. तर त्यांच्याविना मानवता टिकू शकत नाही.दलाई लामा


There is always some madness in love. But there is also always some reason in madness. – Friedrich Nietzsche

प्रेमात काही वेडेपणा नेहमीच असतो. पण नेहमी वेडेपणा मध्ये देखील काही कारण असतात. फ्रीड्रिख निएत्शे

Love Quotes Marathi in one sentence. – Part 1

The greatest healing therapy is friendship and love. – Hubert H. Humphrey

महान उपचार चिकित्सा मित्र आणि प्रेम आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री


Let us always meet each other with smile, for the smile is the beginning of love. – Mother Teresa

आपण नेहमी हसून एकमेकांशी भेटू या, कारण हसणे ही प्रेमाची सुरुवात आहे. – मदर टेरेसा

Love Quotes Marathi


The most important thing in the world is family and love. – John Wooden

जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम. – जॉन वूडन


There is no love without forgiveness, and there is no forgiveness without love. – Bryant H. McGill

क्षमा न करता प्रेमच नाही आणि प्रेम न करता क्षमाच नाही. – ब्रायंट एच. मॅक्गिल


Love is when the other person’s happiness is more important than your own. – H. Jackson Brown, Jr.

प्रेम तेव्हा असते जेव्हा दुसऱ्यांचा आनंद तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. – एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर


Love all, trust a few, do wrong to none. – William Shakespeare

सर्वांवर प्रेम करा, काहींवर विश्वास ठेवा, कुणाशीच चुकीचं करु नका. – विल्यम शेक्सपियर

Love Quotes Marathi in one sentence – Part – 2

We are never so defenseless against suffering as when we love. – Sigmund Freud

जसे जेव्हा आपण प्रेम करतो तसे आपण दुःखाविरूद्ध इतके निराधार नसतो. – सिगमंड फ्रायड


Love has no errors, for all errors are the want for love. – William Law

प्रेमामध्ये कोणत्याही चुका नाहीत, कारण सर्व चुका प्रेमाप्रती असतात. विलियम लॉ


True love stories never have endings. – Richard Bach

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो. – रिचर्ड बाक

Love Quotes Marathi


A flower cannot blossom without sunshine, and man cannot live without love. – Max Muller

एक फूल सूर्यप्रकाशाविना फुलवू शकत नाही, आणि मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकत नाही. – मॅक्स मुलर


Never make a decision when you are upset, sad, jealous or in love. – Mario Teguh

जेव्हा आपण नाराज, दुःखी, हेवा किंवा प्रेमात पडता तेव्हा निर्णय घेवू नका. – मारियो तेगुह

 

Note: Please do comment about link of Quotes which you want in Pictorial format and is not available above, we will make it available soon.

Also read Quotes on Nature here.

If you liked these Quotes, then hit Share buttons below to share it to your loved ones.