मित्र कोणाला म्हणायचे?
मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर
ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.
– पु. लं. देशपांडे
मित्रावर एक सुंदर सुविचार:
हे देखील अवश्य वाचा: मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?