बाबासाहेब आंबेडकर सुविचार मराठी भाषेत, एक आणि एका पेक्षा जास्त वाक्यात :
बाबासाहेब आंबेडकर सुविचार मराठी
- तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल.
- लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात? न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल.
- समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो.
- माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची.
- विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे.
- तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा. स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे व्यर्थ आहे.
- आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपणाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपणाचे लक्षण मानतो.
- धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
- शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
- विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.
- हिंसा ही वाईट गोष्ट आहे. परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
- जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
- जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
- शिका. संघटीत व्हा. संघर्ष करा.
एका वाक्यात बाबासाहेब आंबेडकर सुविचार मराठी – भाग १
- आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो, तो ज्याचा त्याने करायचा असतो.
- प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.
- मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
- जेथे एकता – तेथेच सुरक्षितता.
- काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
- सेवा जवळून, आदर दुरून, व ज्ञान आतून असावे.
- जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.
- स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात, देणगी म्हणून ते लाभत नसतात.
- माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा.
- माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
- दुसऱ्याच्या सुख दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
- पती आणि पत्नी यांच्यातील संबंध सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असावे.
- तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
- स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
- लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
- शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
- चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
- उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
- माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
- शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
- पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
- ग्रंथ हेच गुरू.
- वाचाल तर वाचाल.
- इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
- मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
- तिरस्कार माणसाचा नाश करतो.
- माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.
एका वाक्यात बाबासाहेब आंबेडकर सुविचार मराठी – भाग २
- एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
- द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
- बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
- मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
- सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
- अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
- मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
- ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
- शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
- महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.
- शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.
- आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
- नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
- वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
- मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
- माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
- जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
- शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
- तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
- मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.
- प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
- मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
- तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
- स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
- माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
- बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
- एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
- शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराची लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
अधिक वाचा: विल्यम शेक्सपियर यांचे सुद्धा सुंदर विचार व सुविचार येथे नक्कीच वाचा.