मित्रावर विचार व सुविचार

मित्र सुविचार मराठी

मित्र सुविचार मराठी अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचे व एक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. आशा आहे तुम्हाला हा मित्रावरील हा सुविचारांचा संग्रह नक्कीच आवडेल.

मित्र सुविचार मराठी

 • पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
 • जीवन खूप छोटं आहे. अशा मित्रांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला हसवतात आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेमाची जाणीव होते. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • लोक बदलतात. प्रेम दुखावते. मित्र सोडुन जातात. चुकीचं घडत जातं. पण फक्त हे लक्षात ठेवा जीवन पुढे जात राहतं.. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • तुमच्या मित्रांना कधीच एकाकी वाटू देऊ नका. त्यांच्याशी नेहमी हसत खेळत रहा.
 • खोटा मित्र जो तुम्हाला मिठी मारतो त्याला घाबरा. पण तुमचे शत्रू जे तुमच्यावर हल्ला करतात त्यांना घाबरु नका. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • जीवनात आपण मित्र कधीच गमावत नाही. आपण एवढेच शिकतो कि कोण खरे आहेत. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि जे तुम्हास समस्या सांगतात अशांबद्दल काळजीपुर्वक रहा. प्रत्येकजण जो तुम्हाला स्मितहास्य दाखवतो तो तुमचा मित्र असेलच असं नाही. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येकाकडे ‘एक मित्र’ असतो. पण फक्त भाग्यशालींच्या जीवनात ‘तोच मित्र’ सर्व टप्प्यांमध्ये असतो. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)

मित्र सुविचार मराठी

एकावाक्यात मित्र सुविचार मराठी

 • या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो, पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य.
 • तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
 • मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
 • मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
 • सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
 • आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र.
 • प्रशंसा हे असे हत्यार आहे की ज्यामुळे शत्रु पण मित्र बनु शकतो.
 • लहान सहान बाबतीत मतभेद असले तरी महत्वाच्या बाबतीत सहमत होणे, हे विचारी माणसाला मित्र बनवितात.
 • ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र.
 • पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
 • शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
 • आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन, विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे.
 • खरे मित्र कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळचे असतात. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • तुमचे केवळ स्मित हास्य माहीत असणार्‍या मित्रांपेक्षा तुमचे अश्रु समजणारा एक मित्र खूप मौल्यवान आहे. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • खोटं बोलणार्‍या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • खरं प्रेम आणि विश्वासू मित्र हया दोन गोष्टी शोधण्यास अत्यंत कठीण आहे. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • एक खरा मित्र तो असतो जो तुमच्यातील खरेपणा आणि तुमचे दु:ख ओळखू शकतो, जेव्हा तुम्ही इतरांना हसवण्याच्या नादात असतात. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • तुम्ही मिळवू शकणारी सर्वात मौल्यवान भेट एक प्रामाणिक मित्र आहे. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
 • प्रत्येकाला एका मित्राची गरज असते जो फोन करेल आणि म्हणेल, “कपडे घाल, आपण एका साहसावर जात आहोत.” – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)

मित्र सुविचार मराठी

प्रसिद्ध व्यक्तींचे मित्र सुविचार मराठी

 • चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात. फरक इतकाच कि, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही. – पु. ल. देशपांडे
 • आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय. – अब्राहम लिंकन
 • पती आणि पत्नी यांच्यातील संबंध सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • दोन गोष्टींसाठी तुम्हाला कधीच धावपळ करावी लागणार नाही: खरे मित्र आणि खरं प्रेम. – मैंडी हेल
 • शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. एक सुशिक्षित व्यक्ती सर्वत्र आदरणीय आहे. शिक्षण सौंदर्य आणि युवकांना पराभूत करते. – चाणक्य
 • प्रकाशात एकटे चालण्यापेक्षा अंधारात एका मित्रासोबत चालणे चांगले आहे. – हेलन केलर
 • चांगला माणूस सर्व जिवंत गोष्टींचा मित्र आहे. – महात्मा गांधी
 • शत्रूंना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का? – अब्राहम लिंकन
 • धीरपण माझा मित्र व्हा. – विल्यम शेक्सपियर

मित्र सुविचार मराठी

निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

आपण नात्यावरील विचार व सुविचार वाचनात आणलेत का? येथे नक्कीच वाचा.

मित्र कोणाला म्हणायचे?

जाणून घ्या मित्र कोणाला म्हणायचे

मित्र कोणाला म्हणायचे?

मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर

ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.

– पु. लं. देशपांडे

मित्रावर एक सुंदर सुविचार:

मित्र सुविचार मराठी

हे देखील अवश्य वाचा: मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?