प्रेरणादायी सुविचार मराठी अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचे व एक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. आशा आहे शिक्षकांवरील सुविचारांचा हा संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.
प्रेरणादायी सुविचार मराठी
- फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.
- जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय.
- कर्तृत्वान माणसे कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्वान होऊ शकत नाही. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे.
- जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते, तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
- रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.
- जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. (सचित्र येथे)
- एखादे संकट आले कि समजायचे त्या संकटाबरोबर संधीपण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे.
- एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एका वाक्यात सुविचार
- तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.
- स्वप्नं ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती कि जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
- अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
- काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
- संकटावर अश्या प्रकारे तुटून पडायचं कि जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे.
- कष्ट हि अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.
- स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियातीसुद्धा कधीच करत नाही.
- अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा
- आपल्या कामात आनंद वाटणे हे समृद्धीचे लक्षण आहे.
प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार
- कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो. – व. पु. काळे
- समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. – व. पु. काळे (सचित्र येथे)
- केवळ मीच माझे जीवन बदलू शकते. कोणीही माझ्यासाठी ते करू शकत नाही. – कॅरोल बर्नेट (सचित्र येथे)
- उत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट. त्याला कधीही विश्रांती देऊ नका. ‘जोपर्यंत तुमचा उत्तम अतिउत्तम आणि अतिउत्तम उत्कृष्ट होत नाही’. – सेंट जेरोम
- नेहमी आपल्या सर्वोत्तम करा. आपण आता जे रोपविले आहात, आपण त्याची नंतर कापणी कराल. – ओग मंदिनो
एका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार
- जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं. – नेल्सन मंडेला (सचित्र येथे)
- प्रारंभ करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे. – मार्क ट्वेन
- जोपर्यंत आपण थांबत नाही, काही फरक पडत नाही आपण किती हळू हळू जात आहात. – कन्फ्यूशियस
- नवीन दिवसासोबत नवीन शक्ती आणि नवीन विचार येतात. – एलेनोर रूझवेल्ट
- यशस्वी होण्याचे माझे दृढनिश्चियण पुरेसे सामर्थ्यवान असेल तर अपयशी मला कधीच मागे घेणार नाही. – ओग मंदिनो
- अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. – वॉल्ट डिस्ने
- जीवन १०% तुमच्यासोबत जे घडते आणि ९०% तुम्ही त्याच्यावर कसे प्रतिसाद देता हे आहे. – चार्ल्स आर. स्वीन्डॉल
- सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील जर आपण त्यांचा हिंमतीने पाठपुरावा केला तर. – वॉल्ट डिस्ने
काही प्रेरणादायी सुविचार चित्रफितीच्या माध्यमातून:
तुम्हाला हे प्रेरणादायी सुविचार कसे वाटले? व कोणता सुविचार जास्त आवडला? आम्हाला तुमचा अभिप्राय ऐकण्यास आवडेल!, खालील कमेंट रकान्यात कळवा.
वेदनावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.