गौतम बुद्ध सुविचार मराठी भाषेत एक व एकापेक्षा अधिक वाक्यात अशा विभागात. अपेक्षा आहे तुम्हाला हा संग्रह नक्कीच आवडेल.
- जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल, मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
- वाईटानं वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमानं संपवलं जाऊ शकते.
- भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात आनंदी राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे.
- ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्यानं तो नेहमी वाढतो, कधीही कमी होत नाही.
- जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
- नेहमी रागात राहणं, म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेनं पकडून ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो.
- रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वत:च्या अंतरंगात दीप चेतव. त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.
- माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणीमात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
- जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो.
- शरीरधर्म सगळ्यांना सारखेच आहेत. त्यामुळे वर्णश्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे. माणसे सगळी सारखीच आहेत.
- द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. हा केवळ प्रेमाद्वारे संपुष्टात आणला जाऊ शकतो. हे एक नैसर्गिक सत्य आहे.
- शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही. कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्वकाही नष्ट करतो.
- लक्ष्यापर्यंत पोहचण्यापेक्षा प्रवास चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. हजारो शब्दांपेक्षा एकच शब्द महत्त्वाचा असतो, जो शांती घेऊन येतो.
एका वाक्यात गौतम बुद्ध सुविचार मराठी – भाग १
- आरोग्य ही एक मोठी भेटवस्तू आहे, समाधान मोठी संपत्ती आहे, विश्वास सर्वात उत्तम संबंध आहे.
- कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.
- सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात, पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.
- रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा, मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते.
- जे स्वत: बलवान असूनही दुर्बलांचे अपराध सहन करतात, त्यांनाच क्षमाक्षील म्हणतात.
- पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेकरुपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.
- पाप अपरीपक्व असेपर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
- आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दु:ख होय.
- भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणाने राहू शकतो.
- आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
- पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे.
एका वाक्यात गौतम बुद्ध सुविचार मराठी – भाग २
- दुसऱ्याच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
- जग अनित्य असून सतत बदलत आहे.
- जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
- विश्वाचा आदी आणि अंत यांच्या चर्चेच्या भानगडीत पडू नका.
- वैर प्रेमाने जिंकावे.
- तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही याउलट तुम्हाला तुमच्या क्रोधापासूनच शिक्षा मिळते.
- चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते.
- सत्याचे दान हे इतर सर्व वस्तुंपेक्षा वरचढ असते.
- दुसऱ्यांचे दोष लगेच दिसतात पण जसा एखादा लबाड पारधी स्वत:ला लपवितो त्याप्रमाणे एखादा स्वत:चेच दोष स्वत: लपवितो.
- कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
- देव आणि भक्त यामध्ये माध्यस्थाची गरज नाही.
- जीभ एक तीक्ष्ण हत्यारासारखी आहे रक्त वाहिल्याशिवाय प्राण घेते.
- आपण तेच बनतो ज्याचा आपण विचार करतो.
निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
अधिक वाचा: अब्राहम लिंकन यांचे विचार व सुविचार येथे नक्कीच वाचा.