शब्दांवर सुविचार

आलेल्या विनंतीनिमित्त शब्दांवर विचार सादर. शब्द सुविचार मराठी सुविचार संग्रह एक व एकापेक्षा अधिक व्याक्यात अशा विभागात आहे. प्रसिद्ध व अज्ञात व्यक्तींचे शब्द सुविचार. आशा आहे हा सुविचार संग्रह आपणास  आवडेल. दिलेल्या विनंतीकरता धन्यवाद.

शब्द सुविचार मराठी

  • आईने बनवलं, बाबांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला, आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी निती दिली. त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे. म्हणून तर माझी आज ओळख आहे.
  • मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात. – महात्मा गांधी
  • आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे; म्हणून आपल्याला काय वाटते त्याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत. विचार जगतात; ते दूर प्रवास करतात. – स्वामी विवेकानंद (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. – गौतम बुद्ध (सचित्रासाठी येथे क्लिक करा)

  • लक्ष्यापर्यंत पोहचण्यापेक्षा प्रवास चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. हजारो शब्दांपेक्षा एकच शब्द महत्त्वाचा असतो, जो शांती घेऊन येतो. – गौतम बुद्ध

एका वाक्यात शब्द सुविचार

  • शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील. – बाबासाहेब आंबेडकर
  • ज्या लोकांचे शब्द त्यांच्या कृतींशी जुळत नाहीत अशा लोकांपासून सावध रहा. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • कृतीला शब्दावर अनुरूप करा, शब्दाला कृतीवर अनुरूप करा. – विल्यम शेक्सपियर

  • सत्य बोलाल तर तुमचे शब्द अंकुरतील, सत्याने वागाल तर तुमचे जीवन उदात्त व श्रेष्ठ होईल.
  • सहानुभूती, गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही. – महात्मा गांधी
  • आपले शब्द परत घेण्याने मला कधी अपचन झाले नाही. – विन्स्टन चर्चिल
  • अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
  • लोकांचे त्यांच्या कृतीनुसार व्यक्तीचित्रण करा आणि तुम्ही त्यांच्या शब्दांद्वारे कधीही फसविले जाणार नाहीत. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • आपण न उच्चारलेले शब्दांचे स्वामी आहोत, परंतु आपण बाहेर पडू दिलेल्या शब्दांचे गुलाम आहोत. – विन्स्टन चर्चिल
  • सर्व महान गोष्टी साध्या आहेत आणि अनेकांना एका शब्दात व्यक्त करता येते: स्वातंत्र्य, न्याय, सन्मान, कर्तव्य, दया, आशा. – विन्स्टन चर्चिल
  • सतत वाढ आणि प्रगती न करता, सुधारणा, कामगिरी आणि यश अशा शब्दांचा काही अर्थ नाही. – बेंजामिन फ्रँकलिन
  • रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा, मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते. – गौतम बुद्ध
  • काही जुन्या जखमा खरोखरच बऱ्या होत नाहीत, आणि अगदी छोट्या शब्दाच्या येथे पुन्हा रक्तस्त्राव होतात. – जॉर्ज आर. आर. मार्टिन
  • लोक आपले शब्द ऐकू शकतात, पण ते आपली मनोवृत्ती अनुभवतात. – जॉन सी. मॅक्सवेल
  • जिथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते. – हंस ख्रिश्चन अँडर्सन (सचित्रासाठी येथे क्लिक करा)

आपल्या इंस्टाग्राम पानावरील पोस्ट:

4 Replies to “शब्दांवर सुविचार”

    1. क्षमस्व, आपण पोस्टखाली दिलेल्या समाज माध्यमांच्या बटणाचा वापर करून सुविचार इतरांना पाठवू शकतात. संकेस्थळावर भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a ReplyCancel reply

Exit mobile version