नाते सुविचार अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचे व एक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा नात्यावरील सुविचारांचा संग्रह नक्कीच आवडेल.
नाते सुविचार
- मनाच्या इतक्या जवळ राहा की, नात्यात विश्वास राहील. इतक्याही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल. संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील.
- मैत्री असो वा नातेसंबंध, सगळे बंध हे विश्वासावरच बांधले जात असतात. त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये.
- पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
- नातेसंबंध गुंतागुंतीचे नाहीत: मी तुझी काळजी घेतो, तु माझी काळजी घे. विषय संपला.
- नातं हे हात आणि डोळयासारखे असले पाहिजे. हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात.
- माणसाची ओळख स्वभावातून असावी नावातून नाही. हसत ठेवण्याची जिद्द असावी दु:ख देण्याची नाही. नात्यांना नसते गरज पैशांची ओढ असते ती फक्त पे्रमाची.
एका वाक्यात सुविचार
- प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरी सुद्धा जगण्यासाठी महत्वाची असतात.
- आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
- आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी वेगळे होणं शक्य नसतं.
- रक्ताने नाती बनत असतात आणि विश्वासावर कुटुंब.
- काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात, आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात.
- खरे नाते तेच… जे तुम्हाला भूतकाळासकट स्विकारते, वर्तमानकाळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते! पे्रम देते!
- मैत्रीत्वाच्या आधारावर जे नाते असते, ते सर्वोत्तम नात्यांपैकी एक असते. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
- मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणार्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते.
- ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे, तेंव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा, “हे नातं एवढा काळ का जपलं ?”
प्रसिद्ध व्यक्तींचे नाते सुविचार
- नाते विश्वासावर टिकून राहतात, आणि तो कोणत्याही क्षणी तुटलेला असल्यास, तो नात्याचा मोठा अंत आहे. याशिवाय संवाद साधण्यास असमर्थता देखील समस्या ठरतात. – युवराज सिंग
- ‘मी स्वत:ला खूप दुरपर्यंत एका वाईट नात्यात राहू दिले. हि मी माझ्या जीवनातल्या सर्वात मोठया चुकांपैकी एक केली.’ – ब्रिजिट निकोल
एकावाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे नाते सुविचार
- आरोग्य ही एक सर्वात मोठी भेटवस्तू आहे, समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे, विश्वास सर्वात उत्तम नातं आहे. – बुद्ध
- बहिण कदाचित कुटुंबातील सर्वात स्पर्धात्मक नातं आहे, परंतु एकदा बहिणी मोठ्या झाल्या, ते सर्वात मजबूत नातं बनतं. – मार्गारेट मीड
- पती आणि पत्नी यांच्यातील नातं सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- प्रेमात पडणे आणि एक नातं असणे दोन भिन्न गोष्टी आहेत. – केनु रीव्स
आपल्या फेसबुक पानावरील सचित्र पोस्ट:
एक निवेदन: उपरोक्त सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
आपण लोकांवरील विचार व सुविचार वाचनात आणलेत का? येथे नक्कीच वाचा.