संघर्षावर विचार व सुविचार

संघर्ष सुविचार मराठी भाषेत अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचेएक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. आपल्या वाचकाच्या विनंतीवरून आम्ही हि पोस्ट सादर करीत आहोत. आशा आहे संघर्षावरील सुविचारांचा आम्ही सादर केलेला हा संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.

संघर्ष सुविचार मराठी

  • भविष्यात कितीही यशस्वी झालात तरी भूतकाळात केलेला संघर्ष विसरू नका. तुमचा भूतकाळ तुमचा सर्वोत्तम शिक्षक आहे.
  • आयुष्यात तीन संघर्ष असतात – १. जगण्यासाठीचा संघर्ष २. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. ३. ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष
  • तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! – (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

एका वाक्यात संघर्ष सुविचार मराठी

  • जीवनात जर लक्ष्य मोठे असेल तर संघर्ष देखील मोठाच करावा लागतो.
  • संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही.
  • संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
  • छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

प्रसिद्ध व्यक्तींचे संघर्ष सुविचार मराठी

  • आपण हार मानू नये आणि अडचणींना आपल्याला पराभूत करण्याची परवानगी देऊ नये. – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
  • समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. – व. पु. काळे
  • जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतचा सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. – व. पु. काळे

एका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे संघर्ष सुविचार मराठी

  • शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल. थॉमस पेन

निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

वडलांवर देखील सुंदर विचार व सुविचार नक्कीच वाचायला हवेत.

Leave a ReplyCancel reply

Exit mobile version