वेळेवर सुविचार

वेळ सुविचार अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचेएक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा वेळेवरील सुविचारांचा संग्रह नक्कीच आवडेल.

वेळ सुविचार

  • वेळ तशीही निघूनच जाणार आहे. प्रश्न आहे तुम्ही त्याचा कसा वापर करणार.
  • वेळेला सहज पणे कधीही घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊन गेलेला एक क्षण परत मिळवला जाऊ शकत नाही.
  • जीवन खूप छोटं आहे. अशा मित्रांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला हसवतात आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेमाची जाणीव होते. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माणसे जवळ नसतील.- (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • अशा लोकांचा आदर करा, ज्या लोकांनी त्यांच्या व्यस्त वेळेतही तुमच्यासाठी वेळ काढलाय. प्रेम अशा लोकांवर करा, ज्या लोकांनी त्यांच्या वेळेस महत्त्व न देता तुमच्यासाठी वेळ काढलाय जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • वेळच सर्वकाही आहे. जे काही घडायचं असतं ते घडणारचंं. योग्य वेळी, योग्य कारणांसाठी. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • संयमी रहा. काही गोष्टी वेळ घेतात.
  • विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
  • कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

वेळ सुविचार

एकावाक्यात वेळ सुविचार

  • मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील.
  • गेलेली वेळ पुन्हा येत नाही.
  • वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा.
  • वेळ वाया, आयुष्य वाया.
  • काही त्यांच्या मोकळया वेळात आपल्याशी बोलतात, आणि काही आपल्याशी बोलण्याकरता त्यांचा वेळ मोकळा करतात. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • योग्य वेळेची वाट पाहू नका, वेळेलाच योग्य बनवा. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • ज्या गोष्टींना वाढण्यास वेळ लागतो, त्यांच्यासोबत घाई करण्याचा प्रयत्न करु नका. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
  • बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का?
  • जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.
  • यशस्वी लोकांना वेळेच्या मूल्याची तीक्ष्ण जाण असते.

वेळ सुविचार

प्रसिद्ध व्यक्तींचे वेळ सुविचार

  • स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही. – स्वामी विवेकानंद – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • वेळ हा एक भ्रम आहे. – अल्बर्ट आईन्स्टाईन
  • आपल्या सर्वांकडे वेळ यंत्रे आहेत. काही आपल्याला मागे घेऊन जातात, त्यांना आठवणी असे म्हणतात. काही आपल्याला पुढे घेऊन जातात, त्यांना स्वप्ने असे म्हणतात. जेरेमी आयर्नन्स
  • वेळेसाठी एकच कारण हे आहे कि सर्व काही एकाचवेळी घडू शकत नाही. – अल्बर्ट आईन्स्टाईन
  • परतीत काहीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती देण्यापेक्षा मोठी भेटवस्तू असू शकत नाही. – नेल्सन मंडेला
  • शौर्य आणि वेळ दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत. लिओ टॉल्स्टॉय
  • आपल्याला वेळ योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे आणि नेहमी लक्षात घ्या की योग्य करण्यासाठी वेळ हि नेहमी योग्य असते. – नेल्सन मंडेला
  • वेळ हा सर्वकाही एकाच वेळी घडत ठेवण्याचा निसर्गाचा मार्ग आहे. जॉन आर्चिबाल्ड व्हिलर
  • कठीण वेळ कधीच शेवटपर्यंत राहत नाही, पण कठीण लोक राहतात. रॉबर्ट एच. श्युलर
  • जे योग्य आहे ते करण्यासाठी वेळ नेहमी योग्य आहे. मार्टिन लूथर किंग, जूनियर
  • मांजरीबरोबर घालवलेला वेळ कधीच वाया जात नाही. सिगमंड फ्रायड
  • वेळ आणि आरोग्य दोन मौल्यवान मालमत्ता आहेत ज्यांना आपण कमी होईपर्यंत ओळखत नाही आणि प्रशंसा करत नाही. – डेनिस वेत्ले
  • वेळ हि पैसा पेक्षा अधिक मूल्य आहे. आपण अधिक पैसे मिळवू शकता, परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही. – जिम रोहण
  • जे लोक तुम्हाला आवडत नाही, अशा लोकांबद्दल विचार करण्यात एक मिनट ही वेळ वाया घालवू नका. ड्वाइट डी. आयझेनहॉवर – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • जी वेळ तुम्ही वाया घालवत आनंद घेतला ती वेळ वाया गेलेली नाही. – बर्ट्रांड रसेल
  • सर्व महान कामगिरींना वेळेची आवश्यकता आहे. – माया अॅन्जेलो

वेळ सुविचार

एक निवेदन: उपरोक्त सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध  करून  देण्याचा प्रयत्न करू.

मित्रावर देखील सुंदर विचार व सुविचारयेथे अवश्य वाचा.

Leave a Reply