वडीलांवर विचार व सुविचार

वडील सुविचार अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचेएक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा वडीलांवरील सुविचार संग्रह नक्कीच आवडेल.

वडील सुविचार

  • बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन. स्वत:च्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंत:करण.
  • “आई” एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते. “वडील” एकमेव माणूस जो माझ्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो.
  • आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात. आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात ते बाबा असतात. माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जे घाम गाळतात ते बाबा असतात. आयुष्याच्या रस्त्यावर चालतांना जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात. आपल्या लेकराच्या सुखासाठी जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात.
  • आईने बनवलं, बाबांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला, आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी निती दिली. त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे. म्हणून तर माझी आज ओळख आहे.
  • आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते.
  • बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे. पण मला खात्री आहे, तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन, की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल.

वडील सुविचार मराठी

एका वाक्यात सुविचार

  • आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
  • आई घराचं मागल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो.
  • आपले दु:ख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.
  • आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणुन ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो.
  • कोडकौतुक, वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा. शांत, प्रेमळ, कठोर, रागीट, बहुरूपी बाबा.
  • आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण वडिलांचा हात मात्र पाठीशी कायम असावा.
  • आपले दु:ख मनात लपवून ठेवणारा देव माणूस म्हणजे “वडील”.
  • आई-वडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडीलांना सोडू नका.
  • वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता.
  • बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला, हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला.

वडील सुविचार

प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार

  • जर एक देश भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर मनांची राष्ट्र बनू इच्छित असे, मला असे वाटते की तीन प्रमुख सामाजिक सदस्य आहेत जे काही फरक करू शकतात. ते वडील, माता आणि शिक्षक आहेत. – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
  • जेव्हा एक वडील आपल्या मुलाला देत असतात, दोघही हसतात; जेव्हा एक मुलगा आपल्या वडलांना देत असतो, दोघही रडतात. – विल्यम शेक्सपिअर

सुंदर वडील सुविचार

आपल्या फेसबुक पेजवरील पोस्ट:


वृत्तीवर विचार व सुविचार वाचण्यास विसरू नका! आत्ता येथे वाचा.

एक निवेदन: उपरोक्त सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध  करून  देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Reply