मैत्रीवर विचार व सुविचार

मैत्री सुविचार मराठी भाषेत अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचेएक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा मैत्रीवरील सुविचार संग्रह नक्कीच आवडेल.

मैत्री सुविचार मराठी

  • प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं कि मैत्री होते आणि मनात शिरलं कि प्रेम.
  • सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा. हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
  • श्रीमंत मित्रा सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रा बरोबर वावरतांना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे. हाच मैत्रीचा धर्म आहे.
  • मैत्री असो व नाते संबंध, सगळे बंध हे विश्वासावरच बांधले जात असतात. त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते. ती तर नुसती रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो. इथे फक्त जीव लावायचा असतो. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • असे नाते तयार करा कि, त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा कि ह्रदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा कि त्याने जखम होणार नाही. अशी मैत्री करा कि त्याचा शेवट कधी होणार नाही.
  • जन्म हा एका थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं. प्रेम एका त्रिकोणासारखं असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो.

एका वाक्यात मैत्री सुविचार मराठी

  • मैत्री म्हणजे सर्वकाही.
  • एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
  • चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तूप्रमाणे फार काळजीपूर्वक जपायची असते.
  • मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
  • मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • मैत्रीत्वाच्या आधारावर जे नाते असते, ते सर्वोत्तम नात्यांपैकी एक असते. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री होय.
  • नाती जपली की सगळच जमतं, हळू-हळू का होईना कोणी आपलसं बनतं, ओळख नसली तरी साथ देऊन जातं, मैञीचं नातं आयुष्यात खुप काही शिकवून जातं. (सचित्रासाठी ह्या लिंकवर क्लिक करा)
  • पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्री मधून मिळतो, मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातून आल्यावरच कळतो.

प्रसिद्ध व्यक्तींचे मैत्री सुविचार मराठी

  • मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत. – व. पु. काळे
  • आपण एकटेच जन्मलो आहोत, आपण एकटे राहतो, आपण एकटेच मरतो. केवळ आपल्या प्रेम आणि मैत्रीतूनच आपण भ्रम निर्माण करू शकतो की आपण एकटे नाहीत. – ऑरसन वेल्स
  • जगाशी आपले स्मित वाटा. हे मैत्री आणि शांतीचे प्रतीक आहे. – क्रिस्टी ब्रिन्क्ली

एका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे मैत्री सुविचार मराठी

  • मैत्री हा जर तुमचा कमजोर बिंदू असेल तर तुम्ही जगातील शक्तिमान व्यक्ती आहात. – अब्राहम लिंकन
  • जीवनाची सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे मैत्री आहे, आणि मला ती मिळाली आहे.ह्यूबर्ट एच. हम्फ्री
  • खऱ्या मैत्रीच्या सर्वात सुंदर गुणांपैकी एक गुण म्हणजे समजणे व समजून घेणे. – ल्युसियस अन्नेयस सेनेका
  • प्रकाशात एकटे चालण्यापेक्षा अंधारात एका मित्रासोबत चालणे चांगले आहे. – हेलन केलर
  • महान उपचार चिकित्सा मैत्री आणि प्रेम आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री
  • मैत्री नेहमीच एक चांगली जबाबदारी असते, संधी कधीही नसते.खलील जिब्रान
  • मैत्रीची भाषा शब्द नव्हे तर अर्थ आहे.हेन्री डेव्हिड थोरो
  • मैत्री संध्याकाळची छाया आहे, जी जीवनाच्या मावळत्या सुर्यासोबत वाढते. – जीन डी ला फॉनटेन
  • मैत्रीची खोली परिचयाच्या लांबीवर अवलंबून नाही. – रवींद्रनाथ टागोर
  • प्रेम आंधळं असत; मैत्री त्याचे डोळे बंद करते. – फ्रीड्रिख निएत्शे
  • खरी मैत्री चांगल्या आरोग्यासारखी आहे; ती गमावली जात नाही तोपर्यंत तिची किंमत क्वचितच ज्ञात असते.चार्ल्स कालेब कॉलटन
  • मैत्री दोन शरीरात एक मन आहे. मेनसियस
महान उपचार चिकित्सा

तुम्हाला हे ‘मैत्रीवर सुविचार’ कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

निवेदन: वरील सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

विश्वासावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.

Leave a ReplyCancel reply

Exit mobile version