नात्यावर विचार व सुविचार

नाते सुविचार अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचे व एक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा नात्यावरील सुविचारांचा संग्रह नक्कीच आवडेल.

नाते सुविचार

  • मनाच्या इतक्या जवळ राहा की, नात्यात विश्वास राहील. इतक्याही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल. संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील.
  • मैत्री असो वा नातेसंबंध, सगळे बंध हे विश्वासावरच बांधले जात असतात. त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये.
  • पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसर्‍याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
  • नातेसंबंध गुंतागुंतीचे नाहीत: मी तुझी काळजी घेतो, तु माझी काळजी घे. विषय संपला.
  • नातं हे हात आणि डोळयासारखे असले पाहिजे. हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात.
  • माणसाची ओळख स्वभावातून असावी नावातून नाही. हसत ठेवण्याची जिद्द असावी दु:ख देण्याची नाही. नात्यांना नसते गरज पैशांची ओढ असते ती फक्त पे्रमाची.

नाते सुविचार

एका वाक्यात सुविचार

  • प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरी सुद्धा जगण्यासाठी महत्वाची असतात.
  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  • आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी वेगळे होणं शक्य नसतं.
  • रक्ताने नाती बनत असतात आणि विश्वासावर कुटुंब.
  • काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात, आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात.
  • खरे नाते तेच… जे तुम्हाला भूतकाळासकट स्विकारते, वर्तमानकाळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते! पे्रम देते!
  • मैत्रीत्वाच्या आधारावर जे नाते असते, ते सर्वोत्तम नात्यांपैकी एक असते. – (सचित्रासाठी येथे क्लिक करा)
  • मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणार्‍या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते.
  • ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे, तेंव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा, “हे नातं एवढा काळ का जपलं ?”

सचित्र नाते सुविचार

प्रसिद्ध व्यक्तींचे नाते सुविचार

  • नाते विश्वासावर टिकून राहतात, आणि तो कोणत्याही क्षणी तुटलेला असल्यास, तो नात्याचा मोठा अंत आहे. याशिवाय संवाद साधण्यास असमर्थता देखील समस्या ठरतात. – युवराज सिंग
  • ‘मी स्वत:ला खूप दुरपर्यंत एका वाईट नात्यात राहू दिले. हि मी माझ्या जीवनातल्या सर्वात मोठया चुकांपैकी एक केली.’ ब्रिजिट निकोल

नाते सुविचार सचित्र

एकावाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे नाते सुविचार
  • आरोग्य ही एक सर्वात मोठी भेटवस्तू आहे, समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे, विश्वास सर्वात उत्तम नातं आहे. – बुद्ध
  • बहिण कदाचित कुटुंबातील सर्वात स्पर्धात्मक नातं आहे, परंतु एकदा बहिणी मोठ्या झाल्या, ते सर्वात मजबूत नातं बनतं. – मार्गारेट मीड
  • पती आणि पत्नी यांच्यातील नातं सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • प्रेमात पडणे आणि एक नातं असणे दोन भिन्न गोष्टी आहेत. केनु रीव्स
आपल्या फेसबुक पानावरील सचित्र  पोस्ट:

एक निवेदन: उपरोक्त सुविचारांपैकी तुम्हास हव्या असलेल्या व पोस्टमध्ये उपलब्ध नसलेल्या सचित्र सुविचाराच्या लिंकबद्दल कमेंट करा आम्ही लवकरच लिंक उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न करू.

आपण लोकांवरील विचार व सुविचार वाचनात आणलेत का? येथे नक्कीच वाचा.

Leave a Reply