खास मुलांसाठी एका नवरा-बायकोची गोष्ट

Marathi Stories on Husband, Wife, Angry and Fear

Marathi Stories:

एका नवरा बायकोला नदीच्या पलिकडे जायचे असते. दोरीचा जुना पुल असल्याने व अंधार असल्याने भिती वाटत होती.

नवरा बोलतो की मी जाऊन पहातो. तो माघारी लवकर येत नाही. भयचकित अवस्थेत एका उंच आणि धोकादायक पुलाच्या टोकाला उभी असते. खूप घाबरलेली आणि अगदी एकटी. तिचा नवरा आयुष्याचा जोडीदार असतो पुलाच्या दुसऱ्या टोकाला. तिला तो दिसत नसतो आणि त्याला ती त्याने याव म्हणून ती खूप साद घालते त्याला पण त्याच्याकडून प्रतिसाद शून्य. घाबरलेली बावरलेली ती पुन्हा पुन्हा हाक मारत राहते. आर्ततेने त्याच उत्तर येत “मी बिझी आहे तू कर ना प्रयत्न स्वत:च, जिथे तिथे मीच का हवा तुला स्वत:च काम स्वत: करायला शिक ना जरा”. ती दुखावते मोडते खूप राग येतो नवर्‍याचा पण लगेच सावरते आणि हिमतीने पाउल टाकते त्या धोकादायक उंचच्याउंच पुलावर.

कशीबशी पार करते तो पूल मनातली अपमानाची धग दडपून मात्र नवऱ्याला बघताच बांध फुटून रडत धाव घेते त्याच्याकडे कारण पुलाची मोडलेली बाजू सावरलेली असते त्याने आपल्या खांद्यावर तो दोरखंड घट्ट पकडून ठेवलेला तिच्या सुरक्षिततेसाठी.

कधी कधी स्त्रियांना वाटते कि नवरा गप्प गप्प का?

काहीही मदत नाही करत भलेही तो काही करतांना दिसत नसेल पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वास गमावतात तेव्हा तो कदाचित पुलाची दुसरी बाजू सावरत असेल.

Read marathi quotes on husband here.

Read marathi quotes on wife here.

Read marathi quotes on fear here.

Read marathi quotes on angry here.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Jivnat Shiklele Dhade © 2016-17